Friday, April 19, 2024
Homeराज्यवनमजूर, वनरक्षक व वनपाल यांच्या मागण्या रास्त - मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे...

वनमजूर, वनरक्षक व वनपाल यांच्या मागण्या रास्त – मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांचे प्रतिपादन…वनमजूर, वनरक्षक व वनपाल यांच्या बैठकीत मागण्या मान्य…

Share

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर -नागपूर वन वृत्ताचे मुख्य वनसंरक्षक श्री. रंगनाथ नाईकडे आणि महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री. अजय पाटील यांच्या नेतृत्वात वनमजुर, वनरक्षक व वनपाल यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी वनभवन येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीला नागपूर विभागाचे उपवनसंरक्षक श्री. भारतसिंग हाडा हे प्रामुख्याने हजर होते.

तसेच भंडारा उपवनवनसंरक्षक श्री. राहुल गवई, गोंदिया उपवनसंरक्षक श्री. कुलराज सिंग व तसेच वर्धा उपवनसंरक्षक श्री. राकेश सेपॅट हे व्हिडीओ कान्फरन्स द्वारा सहभागी झाले. तसेच श्री. प्रीतम कोडापे विभागीय वनाधिकारी (दक्षता), श्री. मारबत प्रशासकीय अधिकारी व नागपूर वनवृत्ताचे सर्व सहाय्यक वनसंरक्षक व सर्व वन परिक्षेत्र अधिकारी विडिओ कॉन्फरेन्स द्वारा सहभागी झाले.

या बैठकीमध्ये वनरक्षक व वनपाल यांचे पदोन्नती, तसेच सुधारित वेतनश्रेणी, वनविभागातील बदल्या ऑनलाईन पद्धतीने करणेबाबत, वनरक्षक व वनपाल यांना गस्तीकरिता दुचाकी मिळणेबाबत, वनविभागातील भरती प्रक्रियेमध्ये पोलीस विभागाप्रमाणे वनकर्मचारी ह्याच्या पाल्ल्यांना ५ टक्के आरक्षण मिळणेबाबत,वनकर्मचारी यांचेवर वन्यप्राणी तसेच गुन्हेगार यांचेकडून होत असलेले हल्ल्या बाबत,

वनरक्षक व वनपाल यांना दरवर्षी न चुकता शासकीय गणवेश मिळणेबाबत, उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना उतेजनार्थ बक्षीस मिळण्याबाबत, संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या खात्यात योजना व योजनेत्तर कामाचा निधी वर्ग करणेबाबत, सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत मिळणेबाबत, सेवाजेष्ठता यादी दरवर्षी अद्यावत करून प्रसिद्ध करणेबाबत,

विभागीय चौकशी प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढणेबाबत, प्रत्येक वनपरिक्षेत्र कार्यालयात महिला कर्मचारी यांच्याकरिता स्वतंत्र प्रसाधनगृह बांधणेबाबत, जीर्ण झालेली निवासस्थाने पाडून नवीन निवासस्थाने बांधकाम करणेबाबत, साप्ताहिक रजेचा मोबदला मिळणेबाबत, पोलीस विभागाप्रमाणे कामाच्या तासांचे वाटप करणे व अतिरिक्त कामाचे वेतन व भत्ते मिळणेबाबत, वन्यजीव विभाग व अतिदुर्गम भागात काम करणारे वनरक्षक, वनपाल यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू करणेबाबत,

महिला प्रवर्गातील वनरक्षक, वनपाल यांना कामाचे तास निर्धारित करून अतिसंवेदनशील क्षेत्रात जोखमीची कामगिरी न देणे बाबत, वैद्यकीय कॅश लेस सुविधा लागू करणेबाबत, आश्वासित प्रगती योजना लवकरात लवकर मिळणेबाबत, इत्यादी व तसेच वयक्तिक स्तरावर वनरक्षक व वनपाल यांनी मांडलेल्या इतर मागण्या यावर सविस्तर चर्चा होऊन मुख्य वनसंरक्षक यांनी यातील बहुसंख्य मागण्या मान्य करणार असे आश्वासन दिले. बैठकीला संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री अजय पाटील ,

कार्याध्यक्ष श्री. माधव मानमोडे, नागपूर वनवृत्ताचे अध्यक्ष श्री. सतीश गडलिंगे, श्री. रमेश आदमने, श्री. अरुण पेंदोरकर, श्री. उंचीबगले , श्री. सय्यद शेख भंडारा, श्री. सचिन कापकर- वर्धा , श्री. अनिल खडतकर, श्री. शुक्ल, श्री. वैलथरे, श्री. आनंद तिडके, श्री. संतोष पांडे, श्री. समीर नेवारे, कुमारी अनिता करवेडकर, श्री. दिगंबर गुंडेवार, श्री. उमेश बंगर, तसेच वर्धा, भंडारा, गोंदिया व नागपूर वनविभागातील संघटनेचे इतर पदाधिकारी सभेला उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: