ओबीसी समाजाची जातीय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करावी – संताजी सेना व ओबीसी समाज मूर्तिजापूर यांची मागणी…

मूर्तिजापूर – संपूर्ण भारतामध्ये ओबीसी समाज खूप मोठ्या प्रमाणात असून ओबीसी समाजाची जातीय जनगणना करून स्थानिक स्वराज्य संस्था,शैक्षणिक व शासकीय नोकरी,व इतर संस्थेमध्ये खूप मोठा प्रमाणात ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे.सध्या ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण होते.परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे ते आरक्षण पूर्णत्व रद्द झाले आहे.त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना बसला आहे.

असलेल्या ओबीसी समाजाला सुद्धा बसला आहे.मागील वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आधी शासनाने ओबीसी समाजाची जनगणना करून ओबीसी ची लोकसंख्या जाहीर करून त्या आधारावर निवडणूक घेतली असती तर आज गरीब ओबीसी समाजावर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी वर ही वेळ आली नसती.

बरेच लोकप्रतिनिधी घरची परिस्थिती हालाखीची असल्यावर,कोणी व्याजाने पैसे काढून,तर कोणी शेती विकुण,तर कोणी उसनवारी पैसे आणून,स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले नशीब आजमावले त्यामध्ये ओबीसी प्रवर्गातून जे प्रतिनिधी निवडून आले.आणि जनतेने एक वर्षे उलटत नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे त्या गरीब प्रवर्गातील ओबीसी वर एक प्रकारे घातक झाला आहे.सध्या पद गेल्यामुळे त्यांच्यावर जगावे कसे हा प्रश्न त्याच्यासमोर पडला आहे.

आणि ज्या भागातून ते लोकप्रतिनिधी निवडून आले.त्या भागातला विकास खुंटला आहे.कारण तेव्हा लोकप्रतिनिधींचे पद रिक्त झाल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे काम करण्याचा अधिकार राहिला नाही.तरी माननीय प्रधानमंत्री भारत सरकार व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपणास ओबीसी समाजाच्या वतीने हात जोडून विनंती करण्यात येते की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्या जाहीर करून आरक्षण जाहीर करावे.व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ज्या लोकप्रतिनिधींना अपात्र करण्यात आले आहे.

याबद्दल आपल्या द्वारे फेरविचार याचिका दाखल करावी.व त्यावर स्थगिती आणावी.जेणेकरून ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी मागणी संताजी सेना तालुक्याच्या वतीने व ओबीसी समाज मुर्तीजापुर तालुक्याच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे.

निवेदन देताना संताजी सेना तालुकाध्यक्ष सुमीत सोनोने,संताजी सेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अतुल नवघरे , निलेश सुखसोहळे,जयप्रकाश रावत,विशाल शिरभाते,राहुल गुल्हाने,संदीप चौढाळे,अजय भगत,अमित सोनोने सदर निवेदन हे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष विलास नसले यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here