विजय अंभोरे यांना विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व देण्याची अकोला जिल्हा काॅंग्रेस अनुसूचित जाती विभागाची मागणी…

प्रतिनिधी- अकोला
महाराष्ट्र राज्यामधे आगामी होणार्या राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची नियुक्ती करतांना महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष श्री. विजय अंभोरे यांना विधान परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्याची आग्रही मागणी

अकोला जिल्हा काॅंग्रेस कमिटी ग्रामिण अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाकार्याध्यक्ष श्री. भूषण गायकवाड यांनी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.

श्री. अंभोरे हे मातंग समाजाचे नेते असुन महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीच्या लोकसंख्येत क्रमांक दोन वर असलेल्या मातंग समाजाला आतापर्यंत एकदासुद्धा विधानपरिषदेवर प्रतिनिधीत्व मिळाले नाही. हा मातंग समाजावरील अन्याय असुन मातंग समाज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतीक क्षेत्रात मागासलेला आहे.

त्यामुळे श्री. विजय अंभोरे यांना विधानपरिषदेवर प्रतिनिधीत्व देण्याची मागणी अकोला जिल्हा काॅंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश समन्वयक श्री. जितेंद्र बगाटे,

काॅंग्रेस सेवादल शहर अध्यक्ष श्री. तश्वर पटेल, महानगराध्यक्ष श्री. आकाश सिरसाट, जिल्हाकार्याध्यक्ष श्री. मुकींदा अंजनकार, अक्षय तायडे, आकाश हिवराळे, गौतम उमाळे, संदेश वानखडे, सुशिल गायकवाड, वैभव तायडे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here