तुंलगा बु येथे मोफत उज्वला गॅस कनेक्शन देण्यासाठी १२०० रुपयांची मागणी…

पातूर – निशांत गवई

पातुर येथूनच जवळ असलेल्या तुंलगा बु येथे मागील दोन ते तीन महिण्या आगोदर उज्वला गॅस कनेक्शन घेण्यासाठी एका बुलढाणा जिल्यातील खामगाव च्या गॅस एजन्सी कडून प्रतिनिधी ने गावतील लाभार्थी कडून अर्ज भरून नेले होते.या योजनेत अर्ज भरलेल्या लाभार्थ्यांचे नंबर सुद्धा लागले आहेत.

परंतु ग्रामीण भागात ग्रामस्थाना गॅस ग्राहकांना माहिती नसल्याने अनेकजवळून नेहमी मोफत असलेले उज्वला गॅस हा जास्त पैसे आकारून आर्थिक लूट करण्यात येत असल्याचे चित्र तुंलगा येथे शुक्रवार रोजी पाहायला मिळाले आहे.परंतु काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच खामगाव च्या गॅस एजन्सच्या प्रतिनिधीशी वाद घालून त्याला परत पाठविण्यात आले.

या गॅस कनेक्शन करिता खामगाव वरून अकोला जिल्ह्यातील तुंलगा बु येथे प्रतिनिधी येत असल्याने व जास्त आकारनी मुळे या योजनेपासून अनेक ग्रामस्थ वंचित असल्याचे स्थानिक ग्राम्सथकडून सांगण्यात आले आहे.तसेच ही योजना शासन स्तरावरून अगदी मोफत राबविली गेली आहे.परंतु या प्रतिनिधी मुळे अनेक लाभार्थी या योजने पासून वंचित राहिले आहेत.तसेच तुंलगा बु येथील काही लाभार्थी संबधित गॅस प्रतिनिधी यांच्याशी वाद घालत असताना व्हिडिओ व्हायरल झाले आहेत..

खामगाव तालुक्यातील गॅस एजन्सी प्रतिनिधी यांना दिलेल्या गावात न जाता अकोला जिल्ह्यातील तुंलगा बु येथे अनधिकृतरित्या गॅस विकत असून जनेतेची फसवणूक करून आर्थिक लयलूट करीत आहेत.आपल्या वाडेगाव गॅस एजन्सी कडून अगदी घरपोच व मोफत दिल्या जाते .कोणतीही आकारणी केल्या जात नाही .नियमानुसार उज्वला योजना राबविल्या जात आहे.पंकज सहगल, संचालक, इंडेन गॅस वाडेगाव

मोफत असलेल्या उज्वला गॅस योजनेत जनतेकडून आर्थिक लूट होत असेल तर संबधित प्रतिनिधी यांच्यावर वरिष्ठ प्रशासनाने लक्ष देऊन कडक कारवाई करणे गरजेचे आहे. प्रणव तायडे
अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस बाळापूर विधानसभा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here