रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाचा पंचनामा करण्याची मागणी…

बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी.

रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून या कामाचा पंचनामा करण्याची मागणी यशवंत केंद्रे यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे.सविस्तर माहिती अशी की,राज्य मार्ग ५६ ते काळेगांववाडी रस्त्याचे काम चालू असून शासनाच्या नियमाप्रमाणे होत नसून निकृष्ठ दर्जाचा मुरूम वापरला जात आहे. रस्त्याच्या कडेचे दगड गोटे जमा करून तेच वापरले जात आहे.

काम करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीचा वापर केला जात नाही. रस्त्याच्याकडेची नियमबाह्य नाली काढली जात असून त्यामूळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावापासून रस्ता खराब झाल्यामूळे रस्त्याच्या कामाची सुरुवात गावापासून करण्यात यावे. यामूळे वाहतुकीला अतिशय त्रास होत असून अनेक वेळा या रस्ता कामासाठी वरिष्ठांकडे तक्रारी करूनही दखल घेण्यात आली नाही.

त्यामूळे या तक्रारीची दखल घेऊन निकृष्ठ दर्जाच्या कामाचा पंचनामा करून चौकशी करण्यात येऊन संबंधीतावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा २५ जून पासून ग्रामस्थांसह तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा यशवंत केंद्रे यांनी निवेदनात दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here