डौर ग्रामपंचायत मधील १४ व्या वित्त आयोगातील भ्रष्टाचारची चौकशीची मागणी…

बिलोली – रत्नाकर जाधव

डौर येथिल ग्रामसेवक व सरपंचांनी जवळपास १४ लाखाचा भ्रष्टाचार केला असून या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून ग्रामसेवकास बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी डौर येथील सदस्यांनी बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

बिलोली तालुक्यातील मौ.डौर येथील सरपंच व ग्रामसेवकांनी संगनमत करून ग्रामपंचायतची कुठलीही सभा न घेता १४ व्या वित्त आयोगातील रक्कमेचा कांही कामे न करता तर कांही कामे थातूर मातूर करून जवळपास १४ लाखाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे.

यात सरपंच शेख अहेमदबी महेबूब व ग्रामसेवक प्रकाश वाघमारे यांनी १४ व्या वित्त आयोगाच्या विकास निधीतून ग्रामपंचायतची कोणतीही आमसभा न घेता माहे एप्रिल-मे मध्ये गावातील सि सि रोडवर ६ लाख २७ हजार,अंगणवाडी दुरुस्ती २ लाख १० हजार ,ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती ७४ हजार,शाळा दुरुस्ती २ लाख २७ हजार,ग्रामपंचायत कार्यालया- वर सोलार बसवणे १ लाख ७४ हजार,शाळेवर सोलार बसवणे २ लाख, पाणी पुरवठा ६ लाख ८० हजार असा खर्च केला आहे.

पाणी पुरवठ्याच्या कामात जुनी पाईपलाईन, जुनीच टाकी असून केवळ थातूर मातूर काम केले आहे,अंगणवाडी दुरुस्ती,शाळा दुरुस्ती व ग्रामपंचायत दुरुस्ती हे केवळ कागदोपत्री दाखवली आहेत.

त्याच बरोबर ग्रामपंचायत व शाळेवरचे सोलारसेट ही केवळ कागदोपत्रीच दाखवून बिलं उचलले असल्याची तक्रार माजी सरपंच म.खलील मुनिर पटेल,ग्रामपंचायत सदस्य खयुम हनिफ पटेल,अलीम फकिरसाब,नजीर पटेल फकीर साब, रशिदाबी खयुम पटेल या सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे.

या सर्वांनी बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी शरद झडके यांच्याकडे चौकशीची मागणी करून  सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करावा व ग्रामसेवकाला सेवेतून बडतर्फ करावं अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here