Remdesivir Injection च्या किमतीवर आळा घालण्याची मागणी…

चिखली – दीपक साळवे

कोरोना चा प्रादुर्भाव जसा जसा वाढत आहे तसा तसा Remdesivir Injection चा दाम सुद्धा वाढत आहे. कोरोना ची वाढती सात पाहून, कोरोना च्या नावाखाली गरिबांची महालूट सुरू आहे. अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास खंडागळे यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना केले.

खंडागळे यांनी पुढे निवेदनात नमूद केले की, गेल्या वर्षभरापासून लाँक डाऊन असल्यामुळे रोजगाराच्या साधनावर, सर्वसाधारण जनतेच्या आर्थिक आवकी वर, धंदे पाण्यावर खूप मोठा फरक पडला आहे आणि जनता त्रस्त झाली आहे. आपली व आपल्या परिवाराची उपजीविका कशी भागवायची हा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झालेला आहे.

बऱ्याच ठिकाणी त्या इंजेक्शन व औषधीचा साठा करून त्याची अव्वाच्या सव्वा किमतीमध्ये विक्री करून सर्वसाधारण गोरगरीब जनतेची या कोरोनाच्या कठीण काळामध्ये लूट सुरू आहे.या सर्व प्रकरणांमध्ये लक्ष घालून अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालक मंत्री महोदयांनी सर्वसामान्य गरीब जनतेला न्याय देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे विकास खंडागळे यांचे वतीने करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here