कंत्राटी ग्रामसेवक सौ.खिल्लारे यांना बडतर्फ करण्याची मागणी…

मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला यांकडे निवेदन सादर.

निशांत गवई

सध्या तांदळी बु येथे कार्यरत असणार्या खिल्लारे याआधी मलकापुर ग्राम पंचायत मधे कार्यरत होत्या.तिथे त्यांनी भ्रष्टाचार केल्याचं उघडकीस आले असतानाही अजुनही त्यांचेवर कुठलीही कार्यवाही करण्यात न आल्याने जनतेतुन प्रशासनावर रोष व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणावर लक्ष वेधण्यासाठी पं.स. सदस्या सौ. अर्चना विष्णु डाबेराव यांनी आज निवेदन सादर केले. आता प्रशासन यावर काय कार्यवाही करते यावर सर्वांच लक्ष लागलेलं आहे.

प्रशासनाने लवकरात लवकर ग्रामसेविकेला निलंबित करुन जनतेचा प्रशासनावर असलेला विश्वास अविरत ठेवावा व जाऊ तिथं खाऊ अशी विचारसरणी असणार्या कर्मचारांना प्रशासनाने धडा शिकवावा अशी मागणी जनतेतुन केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here