सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे.
सांगलीतील बी.एस.एन. एल. केबल चोरी होऊन आठ ते दहा दिवस झाले पण तपास गतीने होत असताना दिसत नाही व या चोरीप्रकरणामध्ये महाविकासआघाडीचे राष्ट्रवादीचे नगरसेवक सामील आहेत. त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही.
यामध्ये बीएसएनएलची चे अधिकारीही सामील असण्याची शक्यता आहे.पोलीस प्रशासनावर राज्यातील महाविकास आघाडीचा व मंत्र्यांचा मोठा दबाव आहे. चोरी झालेली बीएसएनएलची केबल केंद्र सरकारची मालमत्ता आहे. अशी केबल चोरी राज्यातही अनेक ठिकाणी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सांगली बीएसएनएल केबल चोरी प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी आमित शहा, ग्रह व सहकारमंत्री भारत सरकार , दिल्ली, अनुराग ठाकूर, माहिती व नभोवाणी मंत्री ,भारत सरकार दिल्ली यांच्या कडे करण्यात आली आहे…