नंडोलीया ऑरगॅनिक कारखाना स्फोट प्रकरणी दोषींवर कारवाईची मागणी…

भारतीय कामगार सेनेचे निलम संखे यांनी पत्राद्वारे केली मागणी.

स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू आणि चार कामगार जखमी झाले होते.

पालघर – तारापूर औद्योगिक वसाहतीमधील नंडोलीया ऑरगॅनिक या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाला होता,आणि चार कामगार गंभीर जखमी झाले होते.याप्रकरणी कारखान्याच्या मालकांसह दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जखमी कामगारांना मोबदला देण्याची मागणी भारतीय कामगार सेनेकडून करण्यात आली आहे.

याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, औद्योगिक विकास मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आहे. तसेच पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत नंडोलीया ऑरगॅनिक कारखाना प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीत प्रत्येक महिन्याला लहानमोठया अपघातांच्या घटना घडत आहेत.या अपघातांमध्ये अनेक कामगारांना नाहक आपला जीव गमावावा लागला आहे.अनेकांना जखमी झाले आहेत.

वसाहतीच्या प्लॉट नं. टी- 141 मधील नंडोलिया ऑरगॅनिक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यात रासायनिक प्रक्रिया सुरू असताना स्फोट होऊन अपघात झाला होता.या स्फोटाची तीव्रतेमुळे सालवड, पास्थळ, बोईसर, तारापूर व किनारपट्टीची गावे आणि पंधरा किलोमीटर अंतरावरील पालघर शहरात कंप प्रकर्षाने जाणवला होता.

नंडोलिया ऑरगॅनिक कारखान्यात याआधीही अपघात झाला होता.त्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कारखाना प्रशासनाकडून करण्यात आल्या नाही. कारखान्यात नियमबाह्य पध्दतीने रासायनिक प्रक्रिया सुरू होत्या.कारखानदारांच्या हलगर्जीपणामुळे भीषण स्फोट होऊन दुर्घटना घडली होती. या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. आणि तीन कामगार गंभीर जखमी झाले होते.

सुरक्षेच्या उपाययोजना न करता कारखान्यात रासायनिक प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली होती.अनुभव नसताना अकुशल कामगारांकडून बॉयलर हाताळण्यात आले होते. गरजू आणि अकुशल कामगारांकडून तुटपुंज्या वेतनावर धोकादायक काम करून घेतले जाते होते.

दोषींवर कठोर कारवाई करून कारखाना मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.तसेच मालकाकडुन स्फोटात जखमी कामगारांना आर्थिक मोबदला देण्यात यावा.कारखान्यात कामगारांच्या सुरक्षितता आणि हिताच्या सुधारणा होण्याबाबत आदेश देण्याची मागणीचे निवेदन भारतीय कामगार सेनेचे निलम संखे यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here