देगलूर शहरातील नागरिकांची घरपट्टी व नळपट्टी माफ करण्याची मागणी…

देगलूर
देगलूर शहरातील जनता कोरोना सारख्या महामारी च्या संकटात २३ मार्च २०२० ते २३मे २०२० या साठ दिवसात म्हणजेच दोन महीन्याच्या कठीण प्रसंगातून गेली आहे हाताला काम नाही, घरात खान्यासाठी भयावह परिस्थिती, जीवनावश्यक वस्तू खरेदी करावी तरी कसे‌ आशा आणीबाणीच्या प्रसंगी सर्वसामान्य कुटुंबाची अत्यंत दयनीय अवस्था.


देगलूर शहरातील नागरिकांना हाताला काम नसल्यामुळे ,देगलूर नगरपरिषद ची घरपट्टी पाणीपट्टी, थकबाकी, वसूली भरणे शक्य होणार नाही त्या करीता नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी शहरातील परिस्थिती लक्षात घेवून नगर पालीकेने साठ दिवसांतील नळपटी, घरपट्टी माफ करण्यात यावी यासाठी शहरातील जागरूक पत्रकारांनी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांना निवेदन देवून घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्याची मागणी केली.

यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटना नांदेड जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे तथा माजी नगरसेवक देगलूर, पत्रकार शेख नाजीम,शेख अजीम अन्सारी यांनी केली आहे.

लॉकडावून च्या काळात सर्व सामान्य नागरिकांचा आर्थिक विकासाचा दर शुन्य आहे.नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार व काही नगरसेवक ,शहरातील जलील सेठ चुनेवाल त्याचे भाऊ आयुब सेठ व अन्य काही प्रतीष्टीत नागरीकानी संकटाच्या काळात जनतेला मोठ्या प्रमाणात मदत केली


नगरपरिषद ची घरपट्टी पाणीपट्टी थकबाकी वसूली शहरातील जनतेला भरणे शक्य नाही , नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांनी परिस्थिती चे गांभीर्य लक्षात घेवून पाणीपट्टी घरपट्टी थकबाकी वसूली माफ करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here