देगलूर बिलोली विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर ४१,९३३ मतांनी विजयी…

भाजपाचे सुभाष साबणे यांना ६६९०७ तर वंचित आघाडीचे उत्तम इंगोले यांना ११,३४८ मते पडली तर नोटाला ११०० मते.

बिलोली – रत्नाकर जाधव

देगलूर बिलोली मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत  काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना महाआघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकरांनी ४१ हजार ९३३ एवढ्या मताधिक्याने भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांचा पराभव केला आहे.दिवंगत आ.रावसाहेब अंतापूरकर यांनी २०१९ मध्ये सुभाष साबणे यांचा २२००० हजार मतांनी केला होता.या निवडणुकीत सुभाष साबणे यांना ६६ हजार ९०७ मते पडली तर बहुजन वंचित आघाडीचे डॉ.उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४८ मते पडली.

ही पोट निवडणूक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण व भाजपाचे नांदेडचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रतिष्ठेची बनवली होती.
देगलूर बिलोली विधानसभेचे दिवंगत आ.रावसाहेब अंतापूरकर यांचे सहा महिन्यांपूर्वी कोरोनाने दुर्दैवी निधन झाले.त्यामुळे या जागेसाठी महाविकास आघाडीकडून दिवंगत आ.अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली.

त्यांच्या विरुद्ध भाजपाने सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली तर बहुजन वंचित आघाडीकडून डॉ.उत्तमकुमार इंगोले यांना उमेदवारी दिली.देगलूर विधानसभेची पोटनिवडणुक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण व जिल्ह्याचे भाजपाचे खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्वतःसाठी प्रतिष्ठतेची बनवली होती.

त्यामुळे या निवडणुकीत महाआघाडीचे अर्धे मंत्रिमंडळ व भाजपाचे केंद्रातील मंत्र्यासह राज्याचे विरोधीपक्ष नेत्यांसह भाजपाचे टॉपमोस्ट नेते प्रचारात सामील झाले होते.त्यामुळे ही लढत अटीतटीची होईल अशी अपेक्षा होती.परंतु ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानात मतदारांनी सर्व तर्कवितर्क अंदाज खोटे ठरवले.या निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकरांनी पहिल्या फेरी पासून मतांची आघाडी कायम ठेवत एकूण ३० फेऱ्यात १ लाख ८ हजार ८४० मत्ते घेत विजय संपादन केला.

त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे सुभाष साबणे यांचा ४१ हजार ९३३ एवढ्या मताधिक्याने पराभव केला. सुभाष साबणे यांना ६६ हजार ९०७ मते पडली. तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ. उत्तमकुमार इंगोले यांना केवळ ११ हजार ३४८ मते पडली. शिवसेनेतून भाजपात दाखल होणारे सुभाष साबणे यांचा अंतापूरकर परिवाराकडून झालेला तिसरा प्रभाव आहे.
दिवंगत आ.रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर ही निवडणूक सुरवातीला एकतर्फी होईल अशी अपेक्षा होती.

परंतु भाजपाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठतेची केल्याने.राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ व केंद्राच्या मंत्र्यांसह राज्याचे विरोधीपक्ष नेत्यांसह भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते या प्रचारसभेत सामील झाल्याने.ही लढत अटीतटीची होईल असा कयास राजकीय विश्लेषकांनी बांधला होता.३० ऑक्टोबर रोजी मतदानाच्या वेळी मतदारांनी गुगल्या टाकत महाविकास आघाडी व भाजपाच्या लोकप्रतिनिधीसह उमेदवारांना ही संभ्रमात टाकले होते.

परंतु आज मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष निकाल देतांना मात्र सुरवातीला एकतर्फी होणाऱ्या कयास खरा ठरवत काँग्रेसचे जितेश अंतापूरकरांना तब्बल १ लाख ८ हजार ८४० मते देऊन काँग्रेस व भाजपाच्या सर्व विश्लेषकांनी केलेले अंदाज खोटे ठरवले.या निवडणुकीत मतदारांनी दिवंगत आ.रावसाहेब अंतापूरकरांना २०१९ मध्ये दिलेल्या मताधिक्यापेक्षा डबल मताधिक्य देऊन जितेश अंतापूरकर यांना निवडून दिले आहे.यात या मतदारसंघाचे जेष्ठ नेते माजी खा.भास्करराव पटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशमुळे मोठे मताधिक्य वाढले हे ही या विजयातून स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here