RFO दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनक्षेत्र संचालक रेड्डी व डी एफ ओ प्रमोद शिवकुमार यांच्या वर गुन्हे दाखल करा या मागणीसाठी शवविच्छेदन गृहा बाहेर कुटुंबीयांनी आंदोलन केले.
अमरावती च्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंज च्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून काल सायंकाळी साडे सात वाजता आत्महत्या केली.
त्यानंतर दिपाली यांना शवविच्छेदनासाठी अमरावती येथे आणले असता वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी व प्रमोद शिवकुमार यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही व त्यांना अटक होत नाही तोपर्यंत दीपाली चव्हाण यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका व्यक्त करत दीपाली चव्हाण यांचे कुटुंबीय व काही वनक्षेत्र कर्मचारी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहाबाहेर ठिय्या मांडून बसले आहे….