प्रिय नवरोबा…दिपाली चव्हाण यांचे नवऱ्याला लिहलेले भावनिक पत्र…

सातारा जिल्ह्यातील एक तरुणी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून दबंग कारकीर्द निभवत असेल अश्या वेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून तिची पाठ थोपटण्याऐवजी तिचा मानसिक छळ केला जातो.. त्यामुळे वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिला टोकाचा निर्णय घ्यावा लागतो..हीच का लोकशाही..

एकीकडे स्त्रियांना देखील माणसासारखं स्थान देण्याचं फक्त बोलतो मात्र प्रत्येक्षात ते घडत नाही.. हे वास्तव वनविभागात दिसून आलंय.. दीपाली चव्हाण हिची कामात चूक नसताना वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार का तिचा छळ करायचे..अन्यायाविरुद्ध तिने लढा देण्याचा प्रयत्न केला मात्र दिपलीची मदत कुणी करू शकले नाही.. हे दुर्दैव म्हणावं लागेल.. महिलांना पायाखाली ठेऊन छळ करणार्या अश्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे..

दीपाली चव्हाण विवाहित जीवन जगत असताना आंत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या लाडक्या नावऱ्यासाठी व आईसाठी चिठ्ठी लिहिली आहे.. यात तिने आपल्या नवऱ्याला सुखी जीवन जगण्याचा संदेश दिलाय.. सोबतच आपल्या आईला काळजी घेण्याचा देखील संदेश दिलाय.. पाहुयात काय भावना कर्तव्यदक्ष महिला अधिकारी दीपाली चव्हाण हिने नवऱ्याला काय लिहिलंय..

प्रिय नवरोबा…

लिहून लिहून थकले. खूप डोकं दुखत आहे. मला तुझी आठवण येत आहे. तुमच्या सोबत बोलत बोलत मी तुम्हाला लिहीत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आता नाही म्हणू शकत जिवापेक्षा जादा कारण आता मी जीव देत आहे..

साहेब मला काय काय बोलले ते सगळं मी तुला सांगितलं. तू मला शांत राहायला सांगतोय मी शांत राहते. पण मला सहन नाही होत तू नेहमी म्हणतोस माझी हार्ड डिस्क भरून गेलेय. खरंच भरून गेलेय. साहेबाने मला पागल करून सोडलय. माझा इतका अपमान कधीच कोणी केला नाही जितका शिवकुमार साहेब करतात..

मी खूप सहन केलं पण आता माझी लिमिट खरच संपली आहे.. यावर उपाय असू शकतो. मी सुट्टी घेऊ शकते पण सुट्टी देखील तो मंजूर करत नाही.. तुझ्याशी बोलायला हवं होतं मी तुझी वाट पाहत होते घरी यायची.. आज आई पण गावी गेली.. घरी कोणीच नाहीये घर खायला उठत आहे.. मी हे पाऊल उचलत आहे मला माफ कर.. जगातला सगळ्यात चांगला नवरा आहेस माझ्यावर खूप प्रेम करतोस.. मला मानसिक त्रास होत आहे म्हणून तू माझ्या जवळ येऊन राहिलास.. आपण रेड्डी सरांना सगळं सांगून सुद्धा त्रास त्याच त्रास देन कमी झालं नाही..

मला माफ कर मी आपल्या बाळाला गमावलं.. मला माफ कर तुला लग्नात दिलेली सगळी वचन अर्धवट सोडून मी जात आहे.. आपल्या संसाराला काळतोंड्याची नजर लागली.. माझ्या बोलण्याने मी कधी तुला दुखावलं असेल तर मला माफ कर.. मी नेहमी म्हणते तू मला सोडून नको जाऊ पण आज मी तुला सोडून जात आहे.. माझ्या आत्महत्येला सर्वश्री जबाबदार विनोद शिवकुमार उपवनसंरक्षक गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यास धरावे, त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी जीव देत आहे..

आपला संसार अपूर्ण राहिला पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू.. माझ्यासाठी तू सगळं काही केलंस हीच कमी पडत आहे.. माझी हार्ड डिक्स फुटत आहे त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे मला माफ कर माझ्या मृत्यूला सर्वस्वी जबाबदार माझा डीसीएफ शिवकुमार हा आहे..

दिपाली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here