शिवशक्ती सामाजिक संघटनेमार्फत बोईसरला रुग्णवाहिका आणि शववाहिकेचे लोकार्पण…

माजी मंत्री आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर.

मनोर – शिवशक्ती सामाजिक संघटना,श्रमिक कामगार संघटना आणि पालघर जिल्हा रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माजी मंत्री आणि आमदार आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसा निमित्त सोमवारी (ता.15)रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी उपलब्ध केलेली रुग्णवाहिका आणि शववहिकेचे लोकार्पण बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पालघर पंचायत समितीच्या सभापती रंजना म्हसकर,उपसभापती चेतन पाटील ,पंचायत समिती सदस्या सलोनी संखे,अनिल रावते,माजी पंचायत समिती सदस्या लीना देशमुख,बोईसरच्या सरपंच वैशाली बाबर, उपसरपंच देविका मोरे,

बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील,बहुजन विकास आघाडीचे अँड नितिन भोईर,पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रशेखर जगताप,आणि बोईसर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप कसबे साहेब उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here