अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पन्नामध्ये घट!…शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात

पातूर : या वर्षी महागडे बीजवाही,रासायनिक खतांसह वाढत्या मजुरीचा सामना करीत पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकरी १८,००० रुपये खर्च करून पेरलेल्या सोयाबीन पिकाची काढणी गेल्या आठवड्या पासून सुरू केली शेतकऱ्यांना एकरी चार ते पाच क्विंटलचा उतारा येत असल्याने, शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे अशक्य झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून पुढील रब्बी पीक पेरणीसह प्रपंचाच्या गाढया सह मुला मुलींचे शिक्षण,व त्यांची लग्नकार्य तसेच विविध बँकेचे पीककर्ज आदींचा डोंगर कसा पार करावा.या चिंतेत शेतकरी सापडला आहे.

प्रत्येक वर्षी भरघोष उत्पन्न होण्याच्या अपेक्षेने शेतकरी शेतिच्या मशागती करिता तगडा खर्च करून खरीप पिकाची पेरणी करतो.परंतु गेल्या काही वर्षां पासून सततच्या नापिकीने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले.त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बाजू ढासळत राहिली.राज्य सरकारने दोन लाख रुपयां पर्यन्त पीककर्ज माफ़ी दिल्यामुळे विविध बँकेने शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप केले.दरम्यान या वर्षीच्या महागड्या बीजवाहि,कीटकनाशके खतांसह वाढत्या मजुरीचा सामना करीत शेतकऱ्यांनी एकरी १८,००० रुपये खर्च करून खरीप सोयाबीन पिकाची पेरणी केली.दरम्यान बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला.तसेच सोयाबीन काढणीस आले असतांना अतिवृष्टीसह सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झेलावे लागले.

गेल्या आठवड्या पासून पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीस सुरुवात केली असून एकरी चार ते पाच क्विंटलचा उतारा येत असल्याने,शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढणे कठीण झाले आहे.अशा परिस्थिती मध्ये महसूल व कृषी विभाग सोयाबीन पिकाची अंतिम आणेवारी किती काढणार याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आहे. आलेल्या उत्पादना मधून शेतकऱ्यांनी बारा महिन्यांच्या घरखर्चा सह पुढील रब्बी पीक पेरणी तसेच मुला मुलींचे शिक्षण व त्यांची लग्नकार्ये व बँकपिक कर्जे कशी फेडावी आदी संकटे शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी ठरत आहेत.

महागाईने गाठले उच्य शिखर

पेट्रोल डिझेलच्या दरवाढी मुळे,जीवनावश्यक वस्तूंचे दर भरमसाठ वाढले.त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत असून जीवन जगणे असह्य झाले आहे.शेतीमालाच्या तुलनेत इतर वस्तूंचे दर दामदुपट्टीने वाढले असतांना शेतमालाचे दर खूप अल्प असल्याने शेतकऱ्यांनी राबराब राबायचे आणि महागडे बीजवाही,कीटकनाशके, खते,खरेदी करून सदर कंपन्यांना व त्यांच्या एजंटांना मोठे करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यां मध्ये चर्चेचा विषय बनला आहे.तरी सरकारने वेळीच खबरदारी घेऊन पेट्रोल डिझेल गॅस आदींचे दर नियंत्रणात आणून वाढत्या महागाईला रोख लावावा.तसेच बीजवाही,रा खते,कीटकनाशके आदींच्या दरावर नियंत्रण आणावे अथवा शेतकऱ्यांना सबसिडी स्वरूपात बीजवाही,कीटकनाशके, व खते आदींवर सूट द्यावी.तसेच शेतकऱ्यांच्या प्रत्तेक शेतमालाला वाढीव हमीभाव देऊन शेतकऱ्यांचा शेतमाल सरकारने नगद रुपात खरेदी करावा अशी शेतकऱ्यां कडून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here