मुर्तिजापुर तालुक्यातील तुर उत्पादनात घट मात्र दरवाढीने शेतकरी मनावर आनंदाचा शिर्काव…!

गरजेपोटी अनेकांना करावी लागणार विक्री.

दरवाढीचा मोजक्याच शेतकर्यांना होणार फायदा.

मुर्तिजापुर – गोपाल ठक

यावर्षी मुर्तिजापुर तालुक्यातील शेतकर्यांचा हंगाम आधारीत शेती व्यवसाय खरीपासून तर रब्बी पर्यंत निराशाजनक ठरला आहे. पेरणी कालावधीत सदोष बियाणे वाटप, अभावी झालेली दुबार पेरणी,अवकाळी पावसाह निसर्गाचा लहरीपणा व बोंडअळी या संपुर्ण समस्यांची काळी छाया शेतकर्यांच्या व्यवस्थापनावर आकर्षीत झाल्याने तथापी उत्पादनात मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

अशातच उत्पादन खर्च कमी असणारे व फायद्याचे मानले जात असलेल्या तुरीच्या पिकाची तालुक्यातील शेतकरी वर्गाने पेरणी झाल्यापासून ते पिक उभारणीत येईपर्यंत पिकाला खते, अन्नद्रव्ये व किटकनाशक फवारणी देत यांसह चांगली जोपासना करीत पिक सांभाळले असतांना. परंतु अचानक नव वर्षाच्या सुरुवातीस अती थंडी व पडलेल्या धुक्याचा पिकावर गंभीर परिणाम होऊन पिक अकाली करपले.

यामुळे तालुक्यातील शेतकर्यांच्या उत्पादनात खुप मोठी तुट पहायला मिळाली. याचा थेट सबंध शेती व्यवस्थापणावर झाला असून शेतकर्यांची शेवटची आशाही मावळली. असे असतांना मात्र कृषी उत्पन्न बाजार समीती क्षेत्रातील तुर दरवाढीत दिवसागणीक होत असलेली उच्चांक मालीका बघून शेतकरी मनावर आनंदाचा शिर्काव होत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.

गत काही आठवड्यापूर्वी तुरीचे दर बघीतल्यास प्रती क्विंटल ५३०० ते ६३०० इतके होते मात्र आता भाववाढीने उच्चांक गाठत सद्या प्रती क्विंटल ६८०० ते ७३५० इतक्या दराने बाजारात विक्री होत आहे.

अशातच कृषी बाजार मुल्य वलयातून तज्ञाचे दरवाढी संदर्भात मिळणारे आशादायी संकेतांचा वेध शेतकरी घेत असल्याने सध्यस्थीतीत तालुक्यातील काही शेतकरी आपल्या कडील झालेल्या तुर पिकाच्या विक्रीस विलंब करणार असल्याचे व्यक्त करीत आहे. मात्र काहींना व्यवहार व खर्चाची पुर्तता करण्यास तुर पिकाची विक्री गरजेची असून त्यांचे यापेक्षा भाववाढ झाल्यास नुकसान होण्‍याचे चित्र आजची बाजार शृखंला चित्रीत करीत आहे.

वातावरणातील बदलामुळे यावर्षी माझ्या तुर पिकाचे लक्षणीय नुकसान झाले असून एकरी दिड क्वींटलच उत्पादन झाले. त्यातही दैनंदीन गरजे करीता मी तुर विकली आहे. भविष्यात यापेक्षा भाववाढ झाल्यास मला कुठलाही फायदा होणार नाही. कैलास निलखन, शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here