न्यूज डेस्क – ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात सोमवारी पहाटे चार वाजताच्या सुमारस उशिरा तीन मजली इमारत कोसळली होती.इमारतीच्या मलब्याखाली दबून ८ जणांचा मृत्यू तर इमारतीत राहणारे बरेच जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती.
त्यानंतर एनडीआरएफ जवानांकडून या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू झालं होतं. आज सकाळी हाती माहितीनुसार या दुर्घटनेतील मृतांची संख्या ३३ वर पोहचली आहे. एनडीआरएफच्या हवाल्याने एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच, ठाणे महापालिकेने या दुर्घटनेतील सर्व मृतांची ओळख देखील पटवली असल्याचे सांगण्यात येत आहे.
इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आजखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून, अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.
सुमारे ४५ वर्षे जुन्या या इमारतीत ४० कुटुंबं राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश होता. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावली होती. जिलानी इमारत दुर्घटनाप्रकरणी तत्कालीन प्रभाग समिती -३ साहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता दुधनाथ यादव यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.