बिलोली शहरातील नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी आमरण उपोषण…

बिलोली – रत्नाकर जाधव

नगरपरिषद हद्दीतील सर्व अतिक्रमण काढण्यासाठी रमेश सुर्गलोड या युवकाने आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा  आजचा दुसरा दिवस असून अद्याप नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली नाही.

बिलोली नगरपरिषदेच्या हद्दीतील  शहरातील सर्व अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण  करण्यात आले आहे.या अतिक्रमण करून जागा भाड्याने देण्याचा गोरखधंदा अतिक्रमण धारकांनी चालवला आहे.

सदरील आईक्रमन काढण्यात यावे यासाठी सुशक्षित बेरोजगार युवक रमेश हणमंत सुर्गलोड यांनी न.प.मुख्याधिकारी ते जिल्हाधिकारी कार्यालया प्रयन्त अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली.

परंतु न.प.प्रशासन ते जिल्हाधिकारी कार्यालया प्रयन्त कोणीही दखल घेतली नाही.त्यामुळे रमेश सुर्गलोड याने दि.१४ सप्टेंबर पासून नगरपरिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.जो पर्यन्त अतिक्रमण हटवणार नाही तो पर्यन्त उपोषण चालूच ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्याने सांगितले आहे.उपोषणाचादुसरा दिवस असून अद्याप नगरपरिषद प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here