पुणे जिल्ह्यात महाराष्ट्र बँकेत भरदिवसा दरोडा…एक कोटी रुपयांच्यावर दरोडेखोर लुटून पळाले…

फोटो- सौजन्य सोशल मिडिया

न्यूज डेस्क – पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावातील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर भरदिवसा दरोडा घटला असून दरोडेखोरांनी १ कोटी रुपयांच्यावर सोन्याच्या दागिन्यासह लंपास झाले आहेत. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरोडोखोरांनी हे कृत्य केलं आहे.

दरोडेखोर हे सियाज कारमधून आले होते. कानटोप्या घालत आलेल्या दरोडेखोरांनी बँकेवर दरोडा टाकलाय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांच्या सियाज गाडीवर ‘ प्रेस ‘ लिहले होते. दुपारी दीड वाजताच्या सुमारास सियाज कारमधून चार दरोडेखोर बँकेच्या आतमध्ये गेले तर त्यांचा पाचवा साथीदार गाडीमधेच थांबला होता. त्यानंतर त्यांनी पिस्तुलाचा धाकाने बँकेतील कर्मचार्यांकडून 30 ते 35 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. दरोडा टाकल्यानंतर शिरुरच्या दिशेने निघून गेले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा टाकल्यानंतर दरोडेखोर आधी शिरुरच्या दिशेने गेले. शिरुरमधून पुढे हे दरोडेखोर अहमदनगरच्या दिशेने गेल्याचं CCTV मधे दिसत आहे. दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटानस्थाळाकडे धाव घेतली. तोपर्यंत दरोडेखोर लंपास झाले होते. मात्र, मिळालेल्या माहितीच्या आधारावर अहमदनगर, पारनेर आणि इतरही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पिंपरखेडला पोहचले आहेत. पुढील तपास सुरु आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here