कोगनोळीत दत्तगुरु क्रेडीट सौहार्द संस्थेचा स्थलांतर व वास्तुप्रवेश सोहळा संपन्न…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

कोगनोळी तालुका निपाणी येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री दत्तगुरु क्रेडीट सौहार्द संस्थेची मालकीच्या इमारतीमध्ये स्थलांतर व वास्तू प्रवेश सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार सुभाष जोशी, चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे या मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतिकारी नागनाथअण्णा नायकवडी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभव नायकवडी यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.

त्याचबरोबर दिपप्रज्वलन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली . व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक करताना संस्थेचे चेअरमन सचिन खोत म्हणाले दिनांक 19 ऑगस्ट 2016 रोजी या संस्थेची स्थापना केली असून आजवर चार वर्षात पंचवीस कोटीची ठेव जमा आहे.

या यशामध्ये आपले मोठे बंधू यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले असून आपल्या वडिलांचा आशीर्वाद नेहमीच पाठीशी आहे. हे सांगताना त्यांना आपले अश्रू आवरता आले नाही.
कमी कालावधीमध्ये चांगले काम करून या संस्था वाढवल्या येणाऱ्या काळात नामवंत संस्था म्हणून नावारुपाला येतील असा मला विश्वास आहे. व आपल्याकडून शक्य असेल तेवढे सहकार्य मिळेल असे मनोगत पंकज पाटील यांनी केले.

ज्या ठिकाणी संस्थेची गरज आहे त्याच ग्रामीण ठिकाणी या संस्था काढल्या असून लोकांनी कर्ज फेडता येईल इतकेच कर्ज घ्यावे. या व्यवसायात संस्थाचालकांनी भावनिक होता कामा नाही .चेअरमन सचिन खोत हा माझा विद्यार्थी असून तो विद्यार्थीदशे मध्ये नेहमीच चांगले विचार मांडत होता. अनेक लोक संधी मिळण्याची वाट पाहत असतात मात्र बुद्धिजीवी लोक संधीची वाट न पाहता संधी निर्माण करतात याचे ज्वलंत उदाहरण सचिन खोत आहेत. असे मनोगत लक्ष्मण चिंगळे यांनी व्यक्त केले.

यावेळी ते पुढे म्हणाले पूर्वी मनगटाच्या जीवावर राजकारण होत होतं. मात्र आता पैशाच्या जीवावर राजकारण होत आहे. त्याला निसर्गच उलटून लावेल असे म्हणाले. या कार्यक्रमाचे उद्घाटक वैभव नायकवडी म्हणाले कर्ज काढणे सोपे असते मात्र ते फेडणे अवघड आहे.

उत्पादित क्षेत्रासाठी कर्ज काढावे बागायत क्षेत्रात सहकार क्षेत्र हे अधिक मजबूत आहे. भविष्यात दत्तगुरु संस्थेने मोठा विस्तार करावा व मल्टीस्टेटची परवानगी घेऊन राज्याबाहेरही ही शाखा काढाव्यात .यावेळी त्यांनी आपले वडील क्रांतिकारी नागनाथअण्णा नायकवडी यांच्या समाज कार्याला उजाळा देताना म्हणाले आपल्या जन्मापासून ते पन्नास पर्यंत नागनाथ अण्णा कधीही घरी आले नाहीत. फक्त समाज कार्य करत होते. त्यांचा मी मुलगा आहे हा मला अभिमान आहे.

शेवटी अध्यक्षीय भाषणात माजी आमदार सुभाष जोशी सर म्हणाले सचिन खोत यांनी दत्तगुरु क्रेडिट संस्थेच्या माध्यमातून गेल्या चार वर्षात चांगली प्रगती केली असुन आपण जे ठरवले ते करू शकतो याचं उदाहरण आहेत . स्वातंत्र्याच्या पिढीचा अस्त होत आहे. गेल्या पन्नास दिवसापासून दिल्ली मधील शेतकरी आंदोलन करत असून याचे भान सरकारला नाही असे टीकास्त्र केंद्र सरकारवर केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कदम सर यांनी केले असून आभार प्रदर्शन विठ्ठल खोत यांनी केल. यावेळी कोगनोळी गावातील विविध संस्थेचे पदाधिकारी व शेकडो जनसमुदाय उपस्थित होता…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here