दर्यापूर | कुत्रा आडवा आल्याने चारचाकीचा भीषण अपघात…दोनजण गंभीर जखमी

न्यूज डेस्क :- दर्यापूर (किरण होले)

कुत्रा आडवा आल्याने आसेगाव नजीक चारचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातात कारने थेट इलेक्ट्रिक डीपीला धडक दिली. यात इलेक्ट्रिक डीपी पूर्णता जमिनीवर पडली. ही घटना शुक्रवार रोजी मध्यरात्री तीन वाजता च्या सुमारास घडली.

या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याचे कळते आहे.लॉक डाऊन दरम्यान जिल्हा बंदी असल्यामुळे काही कारचालक हे पोलिसांना घाबरून आपला प्रवास हा जास्तीत जास्त मध्यरात्रीच्या सुमारास करीत आहे.

अशातच नागपूर येथील अविनाश केशवराव सोनकुसे, व निलेश मोहन भगत रा. नागपूर हे दोघेजण भुसावळ वरून दर्यापूर मार्गे नागपूर कडे जात असताना असेगाव अमरावती टी पॉईंट जवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपा जवळ त्यांच्या कार समोर कुत्रा आडवा आल्याने कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि त्यांची कार ही रस्त्याच्या बाजूला जाऊन इलेक्ट्रिक डीपी ला धडकले.

सदर घटनेसंदर्भात पेट्रोल पंपावरील असलेल्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क साधला.पोलिसांनी घटनास्थळी येऊन या दोघांना उपचारासाठी अमरावती उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here