दर्यापूर पोलिसांची अवैद्य दारू विक्रेत्यावर धाड…

(दबंग कारवाईत सुमारे अकरा हजार सातशे पन्नास रुपये किमतीची देशी -विदेशी दारू जप्त)

दर्यापूर – किरण होले

शहरात विविध ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिस विभागाकडून कारवाई सुरू आहे. शहरात विविध भागत अवैध दारूची व गुटख्या ची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येताच दबंग कारवाई करणे सुरू केले आहे लॉकडाउन मध्ये संचारबंदी असताना नियमांचं उल्लंघन करून अवैद्य दारू विक्री सुरू

असल्याचे कळताच दर्यापूर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी जाऊन पान टपरी मध्ये दारू विक्री केल्या जात आहे असे निदर्शनास आले असता मालक तेथून पसार झाला मात्र काही वेळातच त्यांना शरण जाऊन दारू विक्री करत असल्याची कबुली दिली या धाडीमध्ये आरोपी दिनेश पुंडकर याच्या कडून सुमारे अकरा हजार सातशे पन्नास रुपयांची

देशी-विदेशी दारू जप्त केल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले जप्त करण्यात आलेला मला पुढीलप्रमाणे देशी दारू संत्रा राजा 90 मिली 23 नग, देशी दारू टॅंगो पंच 90 मिली 32 नग ,देशी दारू 180 मिली 33 नग ,इम्प्रिलियर ब्लू 180 मिली 4 नग ,ऑफिसर चॉईस 180 मिली 8 नग, मॅक्डोल नं 1 -180 मिली 4 नग ,रॉयल स्टेग 180

मिली 3 नग ,असा माल आरोपीच्या पाणटपरी मधून जप्त करण्यात आला आहे दारू प्रतिबंधक कायदा साथरोग नियंत्रण कोविडं उपाय योजना अधिनियम 51 ब यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई ए पी आय खंडारे सर याच्या मार्गदर्शनाखाली शरद सारसे बजरंग इंगळे , प्रशांत ढोके यांनी ही कारवाई केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here