लॉकडाऊन दरम्यान अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर दर्यापूर पोलिसांची कडक कार्यवाही…

दर्यापूर – किरण होले

लॉकडाऊन दरम्यान दर्यापूर तालुक्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशी दारूची व गावठी दारूची विक्री सुरू आहे. यात तिप्पट भावाने ही दारू विक्री केल्या जात आहे. यासंदर्भात दर्यापूर पोलिसांना गुप्त माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी ६ मे रोजी विशेष अभियान राबवून ग्राम कळाशी येथे अवैधरीत्या दारू विक्री करणारे 2 नागरिकांवर कारवाई करण्यात आली.

तर थिलोरी येथे 1 व आमला पारधी बेड्यावर 4 ठिकाणी अवैद्द दारू विक्री करणारा ठिकाणावर धाडी टाकण्यात आल्या यात एकूण सात आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून. एकूण 100 लिटर गावठी दारू व 150 लिटर व मोहामास सडवा किंमत 35000 हजार असा एकूण 38300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक आत्राम साहेब सा.सह पोउपनि रविकुमार खंदारे,पोहवा.गोरले, नापोका प्रशांत ढोके,नवनाथ खेडकर,मंगेश अघडते,बजरंग इंगळे, सागर नाथे,शरद सारसे,2 महिला सैनिक यांच्या उपस्थितीत करण्यात आली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here