दर्यापूरात बिहारीबाबूची दादागिरी, महिला ग्राहकांला दिली अपमानास्पद वागणूक…

सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचा मनमानी कारभार उघड…

ग्राहकांशी उद्धटपणे वागत दिले कॅबिनमधून हाकलून…

दर्यापूर – किरण होले

बिहारीबाबूची दादागिरी सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.येथील सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचा मनमानी कारभार सुरू असून,ग्राहकांना हे अधिकारी महाशय अपमानास्पद वागणूक देत आहेत.बँकेत आलेल्या ग्राहकांशी उद्धटपणे वागत या व्यवस्थापकाने महिला ग्राहकाला कॅबिनमधून हाकलून दिले असल्याचा प्रकार दर्यापूरात घडला आहे.

तालुक्यातील माटरगाव येथील सौ.संध्याताई सुभाषराव तायडे ह्या व्यवसाय करण्याकरिता लोनकेस संबंधी  व्यवस्थापक संजीव कुमार श्रीवास्तव यांना भेटण्याकरता आले असता,गेल्या तीन महिन्यापासून वारंवार चकरा मारत असताना,आज या, उद्या या असं सांगत होते.

मात्र लोन केस न करता प्रथम एक लाख रुपये भरा असे सांगितले.तेव्हा त्यांनी सात फेब्रुवारी ला एक लाख रुपये त्यांच्या सांगण्यावरून बॅंकेत भरले सुद्धा,पण त्यांनी वेगवेगळे व्यवसाय करावा,मंडप डेकोरेशन लाऊडस्पीकर हे कोरोना धोरणामुळे हा व्यवसाय चालत नाही,म्हणून तुम्ही दुसरा रेडिमेट कपड्याचा धंदा करा,असे सांगितले व त्यांनी त्याची केस तयार केली असता पुन्हा त्यांनी नकार दिला.आता मिठाईची दुकान सुरू करा असे सांगून ते लोनकेस तयार केली.ती लोनकेस तयार होऊन आली.

मात्र या बिहारीबाबूच्या अंगात आज मग्रुरी आली आणि त्यांनी या महिलेला “गेट आऊट” म्हणत बाहेर हाकलून दिले. माटगाव येथील सौ.संध्याताई सुभाषराव तायडे यांना व त्यांचे पती सुभाषराव तायडे यांना केबिन मधून हाकलून दिले व  “तुमच्याकडून जे होते ते करा”, असे उद्धटपणे सुनावले,एवढेच नाही तर सीसीटीव्ही कॅमेरे बंद कर दुंगा,अशी धमकी दिली.

संबंधित बँक व्यवस्थापक यांना दर्यापूर येथील जेष्ठ पत्रकार यांनी विचारणा केली असता “आप कोण हो मेरे को पुचनेवाले वाले” असे उद्धट उत्तर दिले.
गेल्या सव्वा वर्षापासून श्रीवास्तव हे दर्यापूर येथील सेंट्रल बँकेत व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहे,त्याच्या विरोधात अनेकांच्या तक्रारी असताना प्रत्येकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

त्याचाच परिणाम आज त्यांनी बिहारी रूप दाखवून दिलं अशी चर्चा रंगली आहे.स्वतः मास न लावता माझ्याशी बोलताना आपण मास लावा असल्यामुळे दुसऱ्याच्या मोबाईल वरून मी बोलत नाही असे म्हणणारे बिहारी बाबू स्वतः मात्र मास नव्हता बँकेत सोशल डिस्टन्स चा फज्जा उडताना दिसत आहे तेव्हा मात्र व्यवस्थापक गुपचूप राहतात गजानन देशमुख दर्यापूर,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here