दर्यापूर | ७८ कुटुंबांनी एकत्रितरित्या केले सरकारी जमिनीवर अतिक्रमण…

दर्यापूर तालुक्यातील गायवाडी ग्रामपंचायत अंतर्गत गणेशपूर येथे गट क्र ७ मधील जवळपास सहा ते साडे सहा एकर जमिनीवर एका समाजातील ७८ कुटुंबांनी अवैधरीत्या अतिक्रमण केले असून यातील काही गावातील तर काही गावाबाहेरील असून त्यापैकी बऱ्याच जणांनी घरकुलाचा हि लाभ घेतल्याचे कळते आहे.

सदरील जमीन हि ग्रामपंचायत अंतर्गत सरकारी जमीन असून सदरील जमिनीवर स्मशानभूमी प्रस्तावित असल्याची माहिती मिळते आहे. तरी या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे अशी गावकर्यांची मागणी असून यासाठी गणेशपूर येथे उपोषण सुरु आहे.

तरी शासनाने यात त्वरित लक्ष घालावे हि मागणी जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here