नेर येथील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याची दानापूर येथे क्षेत्रिय भेट…

दानापूर – गोपाल विरघट

तालुका कृषी अधिकारी तेल्हारा यांच्या मार्गदर्शनाखाली व दानापूर येथिल भाजीपाला उत्पादक गाेपाल येउल यांच्या शेतात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची क्षेत्रीय भेट आयोजित करण्यात आली होती.

यावेळी नेर ता. तेल्हारा येथील शेतकऱ्यांनाी नेर धामना बॅरेज चे पाणी सिंचनासाठी उपलब्ध हाेणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकरी अभ्यास दाैऱ्याचे आयोजन दानापूर येथे आयोजन करण्यात होते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी मिलींद वानखेडे, मंडळ कृषी अधिकारी गाैरव राऊत, कृषी पर्यवेक्षक जी. डी. नागेश, कृषी सहाय्यक सुशील काेकाटे, उपस्थित होते.प्रगत शेतकरी संजय येऊल यांनी मिरची प्लास्टिक मल्चिंग बाबत सविस्तर माहिती दिली. सदर भेटीचे नियोजन नेर येथील कृषी सहाय्यक पी जी राऊत यांनी केले.

सदर भेटीत नेर येथील शेतकरी भगवंत बावणे, श्रीकृष्ण चाैके, विठ्ठल सपकाळ, संदिप सपकाळ, गाेपाल वानखडे, आकाश सपकाळ,सागर सपकाळ दानापूर येथील शेतकरी याेगेश राैंदळे, सुनिल धुरडे , संजय येऊल हे उपस्थित होते.

बाजारपेठेच्या मागणी नुसार विकेल ते पिकेल या प्रमाणे पीक पद्धतीमध्ये बद्दल करून पारंपरिक पिकामध्ये फलोत्पादन पिके घेणे या भागातील शेतकऱ्यांनी घ्यावीत.
तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here