आतापर्यंत च्या इतिहासात दानापूर आरोग्य वर्धिनी केंद्राची उत्कृष्ट काम…

दानापूर – गोपाल विरघट तालुक्यातील क्रमांक 2 ची आरोग्य वर्धिनी केंद्र ओळखले जाते. हे आरोग्य वर्धिनी केंद्र नेहमीच आपल्या अकोला जिल्ह्यात दानापूर चे नाव उंच शिखरावर रोवत असते .त्यातच आज चा दिवस हा या आरोग्य वर्धिनी केंद्रा करिता मानाचा दिवस ठरला आहे.

कोरोना लसीकरण हे जिल्ह्यातील सर्वच आरोग्य वर्धिनी केंद्रात चालू आहे .मात्र आज दानापूर च्या आरोग्य वर्धिनी केंद्राने लसीकरण आकडेवारीत उत्तुंग भरारी घेतली आहे. 18 ते 44 वयोगटात चालू असलेल्या लसीकरणाची आज 234 लोकांनी हजेरी लावत लस घेतली.

अभिमानाची बाब म्हणजे अकोला जिल्ह्यातील आरोग्य वर्धिनी केंद्राच्या तुलनेत लसीकरणाच्या बाबतीत आज दानापूर येथील आरोग्य वर्धिनी केंद्र प्रथम क्रमांकावर असल्याचे वैद्यकीय अधिकारी सौ, सुजाता भीमकार यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले.यावेळी डॉ, सौ ,सुजाता भीमकार यांच्या नेतृत्वाखाली येथिल डॉ, योगेश प्रभे व डॉ, कल्याणी उखळकर, सर्व आरोग्य सेवक , आशा स्वयंसेविका आरोग्य वर्धिनी केंद्राचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here