शहर विकासात नगरपालिकेचा दुजाभाव…नगरसेविका सीमा बूटके यांनी दिला उपोषणाचा इशारा…

चिमूर : प्रभागाचा विकास झाल्यास शहराचा विकास होईल, असा विकास आराखडा प्रत्येक नगरपालिकेचा असतो. मात्र, चिमूर नगरपालिका या विकास आराखड्याला छेद देत प्रभागातील विकासात दुजाभाव करीत असल्याचा आरोप नगरसेविका सीमा बुटके यांनी केला आहे.

दोन दिवसात यावर तोडगा न काढल्यास उपोषण करू, असा खणखणीत इशारा सीमा बुटके यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

चिमूर नगर परिषदच्या वतीने शहरातील अनेक प्रभागात विकास कामे सुरू केली आहेत. मात्र, प्रभाग क्रमांक ६ मधील मंजूर विकास कामे सुरू करण्यास नगर परिषद प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्षित करीत असल्याचा आरोप नगरसेविका सीमा गजानन बुटके यांनी केला आहे. त्यांनी याबाबत मुख्याधिकारी यांना बुधवारला निवेदन दिले.

यातून नगरसेविका बुटके यांनी पालिका प्रशासनाला दोन दिवसांचा अवधी दिला आहे. येत्या दोन दिवसात प्रभाग क्रमांक ६ मध्ये विकास कामे सुरू करण्याबाबत तोडगा काढून कामे सुरू करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

◆ प्रभाग ६ मध्ये अनेक विकास कामे मंजूर आहेत. मात्र, विकास कामे सुरू करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ‘राजकारण’ करीत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने विकास कामे ठप्प ठेवून दिरंगाई करीत असल्याने याचा नाहक फटका नागरिकांना बसणार आहे. त्यामुळे प्रभाग ६ मधील मंजूर विकास कामे तात्काळ सुरू करावे,

अन्यथा शुक्रवार १९ जूनपासून नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करू, असा इशारा नगरसेविका सीमा गजानन बुटके यांनी दिलेली निवेदनातून दिला आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळा सुनील दाभेकर, प्रमोद दांडेकर, सचिन पचारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here