यांच्याकडून महसुल आणी कृषी विभागास निर्देश.
अहमदपूर – बालाजी तोरणे
गेल्या महीन्याच्या शेवटच्या आठवडाभरात लातूर जिल्ह्यातील काही गावात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे व नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे व इतर नुकसान झाले आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील हडोळती गावातील आणी परीसरातील खरीप पिकांचे यावेळी मोठया प्रमाण नुकसान झाले आहे.
येथील शंभर पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिककार्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री लातूर ना. अमित विलासराव देशमुख यांच्याकडे निवेदन देऊन खरीप पिकाच्या नुकसान भरपाई मिळावे अशी विनंती केली आहे.
पालकमंत्री ना. देशमुख यांनीही तातडीने लातूर जिल्हा प्रशासन आणी कृषी विभागास हाडोळती परिसरात परिसरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्या संदर्भात निर्देश दिले आहेत. नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यास ही सांगितले आहे.
अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथे व या गावच्या परीसरात अचानक मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अचानक आलेल्या पावसामुळे काढणीस आलेले सोयाबीन, वावरात काढून ठेवलेले सोयाबीनसह खरीपातील उभ्या पिंकाचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी नदीनाल्यांना पाणी आल्याने शेतजमिनीचे नुकसान झाली आहे.
शेतातील माती तसेच अवजारे वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अचानक पडलेल्या पावसाने हिरावुन गेला. यामूळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी अधिक अडचणीत आला आहे.
अहमदपूर तालुक्यातील हडोळती गावातील आणी परीसरातील शंभर पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या संदर्भात पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांना निवेदन दिले. अचानक पडलेल्या पावसामूळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन पालकमंत्री ना.देशमुख यांनी महसुल आणी कृषी विभागास झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.