सांगली – ज्योती मोरे
देशात घरगुती गॅस, पेट्रोल,-डिझेल तसेच खाद्यतेल यांची प्रचंड दरवाढ पाहता सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झालेला आहे.भाजप सरकारची सत्ता आल्यापासूनच ही दरवाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोणामुळे लोकांच्या हाताला काम नव्हते तरीसुद्धा ही दरवाढ वाढत असताना दिसत आहे. या दरवाढीची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.
असा इशारा दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांनी दिला आहे. आज दलित महासंघाच्या वतीने ,दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर गॅस सिलेंडर ओढत मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष वनिताताई कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख महेश देवकुळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण वारे, जिल्हा उपाध्यक्ष अजित आवळे, मिरज तालुका अध्यक्ष सचिन भाऊ मोरे, शहराध्यक्ष विजय घाडगे, मारुती भोसले, सागर दोडमनी, संभाजी मस्के, सागर कांबळे, शितल शिंदे, महावीर चंदनशिवे, प्रकाश वाघमारे, नेताजी आवळे, प्रशांत व्हनमाने, सोनाली ताई मोहिते, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.