दहीहंडा पोलिसांची दोन ठिकाणी जुगारावर धाड, ५९३० रुपयाचा मुद्देमाल जप्त…

पोलिस स्टेशन दहीहंडा ठाणेदार प्रकाश अहिरे यांचे मार्गे दर्शनखाली पोलिस स्टेशन दहीहडा हद्दीतील चालू असलेल्या वरली अड्डयावर दहीहंडा पोलिसांनी दोन ठिकाणी धाड टाकून सुमारे ३००० व २९३० असा ऐवज जप्त करत तीन जणांना ताब्यात घेतले आहे.तर तीन फरार झाले.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १ रोजी सायंकाळच्या सुमारास दहीहंडा ते कुटासा रस्त्यावरील जवळील खुल्या पटांगणावर सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला.

असता या छाप्यात आरोपी1. यशवंत भानुदास ढोकणे रा. दहीहंडा 2. गजानन सुखदेव आठवले रा. दहीहंडा.जणांना ताब्यात घेण्यात आले.व फरार आरोपी1 पुरुषोततम ढोरे रा. सुकळी (पो स्टे येवदा) 2प्रकाश मोरे दहीहंडा हे सर्व जण खुल्या जागेत वरली खेळतांना वरली साहित्य साधन एकूण २९३० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

तसेच या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १ रोजी सायंकाळच्या सुमारास दहीहंडा बस स्टँड प्रवासी थांबा जवळील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला.

असता या छाप्यात आरोपी1 असोल तुकाराम आठवले दहीहंडा याला ताब्यात घेण्यात आले.तर आशिष गावंडे रा जैनपूर पिंपलोद (पो.स्टे.येवदा) हा फरार झाला. यांचे कडून वरली मटका साहित्य सह एक मोबाईल किंमत 500 व नगदी 2500 असा एकूण 3000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यासंदर्भात दहीहंडा पोलिस स्टेशन चे संभाजी हिवाळे यांच्या फिर्यादीवरून दहीहंडा पोलिस स्टेशनमध्ये मुबंई जुगार अ‍ॅक्ट प्रमाणे १२प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पोलीस निरिक्षक ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पि.एस.आय संभाजी हिवाळे आपले सहकारी पोलीस कर्मचार्‍यांच्या सोबत करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here