डहाणू | वानगाव कोविड रुग्णालयातील कोविड योद्धाच्या मदतीला सरसावले ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान वानगाव यांचे हाथ.

विनायक पवार – पालघर

देशासह राज्यात कोरोणाच्या दुसऱ्या लाटेने आपले गंभीर रूप धारण केले असून यामध्ये प्रशासना सोबत आरोग्य यंत्रणाही हतबल झालेली दिसून येत आहे.

देशातील व राज्यातील विविध सामाजिक संघटना विविध पदाधिकारी कोरोना काळामध्ये आरोग्य यंत्रणेला आर्थिक व इतर मदत देऊन हातभार लावत आहे.

यातच वानगाव येथील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान वाणगाव मदतीसाठी पुढे येऊन ग्रामीण रुग्णालय वानगाव (कोविड सेंटर) येथील सरकारी वैद्यकीय कोरोना योद्धे डॉ, गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाने कोविड रुग्णाना उपचारासाठी हवी असलेली साधन सामग्री व रुग्णालयातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली विविध सुरक्षा सामग्री सुमारे 40000 ते 50000 हजार रुपये किमतीचे वाटप संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश बाबा जोशी,

उपाध्यक्ष गोपाळ सर ,सेक्रेटरी भारंबे सर आणि नव्याने प्रतिष्ठानचे सदस्य झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य व विवेक कोरे तसेच वानगाव येथील युवा तरुण कार्यकर्ते मंगेश जोशी ,बिपिन टेलर ,यांच्या उपस्थितीत रुग्णालयातिल वैद्यकीय अधिकारी गायकवाड,डॉ महेश, डॉ पिंपळे व वानगाव कोविड सेंटर रुग्णालयातिल कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये प्रशासनाने कोरोणाच्या दिलेल्या नियमाचे पालन करून सामग्री चे वाटप करण्यात आले.यावेळी कोविड सेंटरला पुढे ही काही मदत लागल्यास वानगाव ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान मदत करणार आसल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सदस्यांनी सांगितले.

यावेळी वानगाव येथील कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्गाने ज्येष्ठ नागरिकांचे विशेष आभार मानले.

1 COMMENT

  1. जेष्ठ नागरिक संघाचे त्रिवार अभिनंदन आणि आभार ! सामाजिक जाण ठेवून आपण केलेल्या महत्त कार्य गौरवास्पद आहे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here