विद्युत वितरण कंपनीची दादागिरी , जोर जबरदस्ती ने काठल्या जात आहे शेतकऱ्यांचे वीजबिल…

शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे असलेले राजकीय मंडळी गेली कुठे

दर्यापूर ,(किरण होले)
गेल्या सहा महिन्यापासून शेतकरी हा लोक डॉन पासून पूर्णता हवालदिल झालेला आहे . शेतीचे कामे नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा मोठा सामना करावा लागला आहे.

तू आता हळूहळू लॉक डाऊन कमी होत चालले आहे . परंतु विद्युत वितरण कंपनी दर्यापूर च्या वतीने आता संपूर्ण तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे थकित बिल असेल त्यांचे थकीत बिल हे जबरदस्तीने काठल्या जात आहे.

आता पेरणीचे दिवस तोंडावर आलेले असून शेतकऱ्यांना बी बियाणे हो मजुरांसाठी पैशाची व्यवस्था लावणे अतिशय कठीण झालेले आहे त्यात विद्युत वितरण कंपनी अशाप्रकारे दादागिरी करून शेतकऱ्यांची वीज बंद करत आहे .

त्यामुळे शासनाने लॉक डाऊन दरम्यान शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे आर्थिक मदत न केले असले तरी अशाप्रकारे विद्युत वितरण कंपनी दादागिरी करून शेतकऱ्यांची वीज कापत आहे .

हे थांबावे जेणेकरून शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी काही दिवस मुभा मिळेल व त्यानंतर शेतकरी वीजबिल भरू शकेल . असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे .

परंतु दर्यापुर तालुक्यातील थिलोरी येथे विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येऊन एकाही शेतकऱ्याला माहिती न देता जोर जबरदस्तीने शेतकऱ्यांची वीज बंद करणे सुरू केले आहे. ही विद्युत वितरण कंपनी ची दादागिरी तातडीने थांबवावी अन्यथा विद्युत वितरण कंपनी व सरकारच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here