बबली सिनेमातील ‘तू काही बी म्हण बबले पण दादा नको म्हणू’ गाण्याचा महाराष्ट्रभर धूमाकूळ…!

मुंबई – गणेश तळेकर

‘तू काही बी म्हण बबले पण दादा नको म्हणू’ अशी गमतीदार टॅगलाईन असलेल्या ‘बबली’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘तू काही बी म्हण बबले पण दादा नको म्हणू’ या गाण्याने महाराष्ट्रभरात धमाल उडवून दिली आहे. पॅशन मुव्हिज प्ची प्रस्तुती असलेल्या बबली या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन रॉबर्ट मेघा यांनी केले असून सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी सतीश सामुद्रे यांनी सांभाळली आहे.

विशेष म्हणजे या सिनेमाची कथाही त्यांनीच लिहिलेली आहे. बबली सिनेमातील गाणेही महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांना खूप आवडत असून लोकप्रिय झाले आहे.
यूट्यूबच्या आजच्या जमान्यात प्रेक्षकांना सिनेमाची गाणी आधी माहीत होतात, बघायला मिळतात. हे गाणेही अशाच पद्धतीने यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले असून प्रेक्षकांचे चांगले व्ह््यूज या गाण्याला मिळत आहेत, अशी माहिती निर्मात्यांनी दिली.

विषयाचे वेगळेपण ही मराठी चित्रपटांची ओळख झाली आहे. अशाच एका आगळ्यावेगळ्या विषयावर आधारित एक नवीन सिनेमा येऊ घातलाय ज्याचं नाव आहे ‘बबली’. आता ‘बबली’ म्हटलं तर सुप्रसिद्ध चित्रपट, ज्याचा ‘सिक्वेल’ सुद्धा येऊ घातलाय, ‘बंटी और बबली’ चा मनात विचार येणे साहजिकच आहे. परंतु यांच्यात नावाव्यतिरिक्त काहीही साधर्म्य नाहीये. निर्माते सतीश सामुद्रे, कथा देखील त्यांनीच लिहिली आहे, यांच्या ‘बबली’ चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ नुकताच अनावरीत करण्यात आला.

रॉबर्ट मेघा यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढीस लागली आहे. ‘तू काही बी म्हण बबले पण दादा नको म्हणू’ अशी टॅगलाईन असलेला ‘बबली’ हा चित्रपट त्याच्या कथानकाबद्दल बरंच काही सांगून जातो असं वाटत असलं तरीही कथानकातील वळणं प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्यचकित करेल असे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे.

‘बबली’ च्या छायांकनाची बाजू शिवा राव यांनी सांभाळली असून संगीताची जबाबदारी सांभाळलीय प्रकाश प्रभाकर यांनी. प्रकाश प्रभाकर यांच्या गीतांना आवाज दिलाय स्वप्नील बांदोडकर, मोहम्मद इरफान आणि वैशाली माडे यांनी. चेतन रघु चौधरी हे बबली चे सहनिर्माते असुन प्रदीप कुमार वर्मा आणी गणेश तळेकर हे ‘बबली’ चे सहदिग्दर्शक आहेत संकलन केले आहे सिद्धेश प्रभू यांनी.

या चित्रपटाचे एक्सएक्युटीव्ह प्रोड्युसर योगेश डगवार आहेत तर नृत्यदिग्दर्शक आहेत मयूर अहिरराव. प्रीती चौधरी यांनी कॉस्च्युम डिझाईनिंग केले असून कलादिग्दर्शक आहेत कपिल जोशी.एका भावनिक कथेला मनोरंजनाची झालर असलेला व पॅशन मुव्हीज प्रा. ली. ची प्रस्तुती असलेला ‘बबली’ लवकरच प्रदर्शित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here