पातूरच्या मोमीनपुर्यात सिलेंडर स्फोट; दोन जखमी…

घराला लागलेली आग अग्निशामक दलाचे सतकर्तेने विझवली…

पातुर – निशांत गवई

पातुर शहरातील मोमीनपुरा येथे मंगळवारी दहा वाजता घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत दहा हजार रुपयाची राशी जळाली आणि जखमी झालेल्या दोघांना उपचारार्थ अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पातुर शहरातील मोमीन पुरात राहणाऱ्या अल्फिया सकाळी दहा वाजता स्वयंपाक गृहात चहा बनवण्यासाठी गेल्या असता गॅस स्टोव्ह सुरू केला असता सिलेंडरचा भडका उडाला यामध्ये अल्फिया यांचे हात आणि पाय भाजले. स्फोट होताच अल्फिया यांनी किंकाळी फुटली त्यांच्या मदतीला धावून आलेला चुलत भाऊ रिजवान वय 28 याचीसुद्धा हात आणि पाय भाजले.

घटनेची माहिती कळताच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते दुलेखा यांनी जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ नेले त्यानंतर जखमींना अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका मार्फत पाठविण्यास मदत केली केली.

सिलेंडर चा भडका झाल्याने व्यापारी इक्बाल अंसरी यांच्या घराला आग लागली सदर आगी मध्ये दहा हजार रुपयाच्या नोटां सह इतर साहित्य जळून खाक झाले.
पातुर अग्निशामक दलाचे वाहन चालक अशपाक सय्यद मुश्ताक, फायरमन प्रकाश चावरे, प्रल्हाद वानखेडे, आकाश तेजपाल आदींनी तातडीने आग विझवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here