वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पहाता कठोर अंमलबजावणी…
बुलढाणा – अभिमान सिरसाट
जिल्ह्यामध्ये कालपर्यंत 199 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने संचार बंदीचा आदेश जारी केला आहे. कोरोना रुग्णांची वाढ लक्षात घेता शाळा कॉलेज महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्यात आले असून शिवजयंतीच्या मिरवणूकाही रद्द करण्यात आल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी भारतीय साथरोग अधिनियमान्वये covid-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होऊ नये याकरिता शासन आदेश जारी करून जिल्ह्यासह शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी लागू केली आहे.
तसेच मार्गदर्शक सूचनाही जारी करून लागू करण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे – शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. सर्व प्रकारच्या आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमास पन्नास व्यक्तींनाच परवानगी असेल.
लग्न समारंभास पन्नास व्यक्तींनाच परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळणे बंधनकारक राहील. सर्व आठवडी बाजार दुपारी चार नंतर बंद राहील तसेच वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या आदेशाचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.