औरंगाबाद – विजय हिवराळे
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद शहरात आज , २३ रात्री पासून संचारबंदी लागू होणार आहे . ही संचारबंदी १४ मार्चपर्यंत राहणार आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी, याकाळात जीवनावश्यक वस्तू, उद्योग कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्या बैठकीत निर्णय झाला. पुढील टप्प्यात आठवडी बाजार आणि भाजीमंडई बाबत निर्णय होणार आहे.