कोगनोळीत जय भिम चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी…

कोगनोळी – राहुल मेस्त्री

दि.2 नोव्हेंबर रोजी अमँझाँन प्राईमवर प्रदर्शित झालेला साऊथ सुपर स्टार सुर्या शिवकुमार यांचा जय भिम हा चित्रपट देशभरात बऱ्याच ठिकाणी चर्चेचा विषय ठरत आहे.1993 साली तामिळनाडूतील आदिवासी नागरिकांच्यावर झालेला अन्याय या सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट असुन देशभरात या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे.

जे धाडस बाँलीवुडला करत आले नाही ते साऊथ चित्रपट इंडस्ट्रीजने चित्रपटाचे नाव जय भिम ठेवून धाडस करून दाखवले आहे.अशी सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटातील राजाकन्ना ,सेंघिनी ,पेरुमल स्वामी आणि वकील के चंद्रु या पात्रांच्या अभिनयाने या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत.हा चित्रपट प्रत्येक गावागावात तरुण मंडळाच्या वतीने पडद्यावर दाखवण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे दि.15 रोजी कोगनोळी ता.निपाणी येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे येथील तरुण मंडळाच्या पुढाकाराने जय भिम हा चित्रपट पडद्यावर दाखवण्यात आला.हा चित्रपट पाहण्यासाठी कोगनोळी येथील बहूजन समाजातील हजारो नागरिकांनी गर्दी केलेले चित्र पहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here