४ गावात कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित, १०० हेक्टर मधील पीक धोक्यात, शेतकरी संकटात…

पातूर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील हिंगणा,तांदळी ,बेलुरा या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपचे बिलाचा भरणा न केल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील संबधित कर्मचारी यांनी विद्युत पुरवठा खंडित केला असल्याने शेतकरी संकटात पडले आहेत. यामुळे शेतकऱ्याच्या शेतातील पिके धोक्यात आले आहे. विद्युत पुरवठा खंडीत केल्याने हिंगणा येथील शेतकरी सर्व एकत्रित बसस्थानक ठिकाणी जमा होऊन संबंधित महावितरण कार्यालयाची संपर्क साधला असता कॉल घेतला नाही.

संपर्क होऊ शकला नाही म्हणून शेतकरी वैतागुण महाव्हॉईस शी सर्पक साधून व्यथा मांडली आहे. यावेळी शेतकरी श्रीकृष्ण इंगळे, भगवान उजाडे,दीपक उजाडे ,बंडू इंगळे, राहुल इंगळे ,उत्तम इंगळे ,सुधाकर इंगळे,गणेश उजाडे,निलेश उजाडे,राजेश मारोकर,प्रकाश इंगळे, विकास इंगळे, नितीन सोनोने, आनंदराव उजाडे, संदीप उजाडे, धम्मदीप इंगळे, ज्ञानेश्वर उजाडे,महादेव उजाडे,मनोहर इंगळे,दिनकर उजाडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here