अकोला – आज दि 19,01,21 रोजी दहशतवाद विरोधी पथक लक्सरी बसस्टैंड परिसरात गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करीत असताना एक इसम लक्सरी बसस्टैंड परिसरात देशीकट्टा सोबत बाळगून लोकांना धाक दाखवून, धमक्या देवून लूटमार जबरी चोरी करण्याचे उद्देशाने फिरत आहे.
अशी खात्रिशिर माहितीवरून सापळा रचुन छापा मारला असता सराइत गुन्हेगार सैययद आसिफ सय्यद अब्बास रा भगतवाडी हा विनापरवाना प्राणघातक शस्त्र देशीकट्टा अग्निशस्त्र सह 2 राउंड जीवंत काडतुस कीमत 6000 रूपयांचा मिळून आल्याने आरोपी सय्यद असिफ सैय्यदअब्बास रा भगतवाड़ी यास अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी हा कुख्यात गुन्हेगार असून आरोपी विरुद्ध खालिल पो,स्टेस गुन्हे नोंदआहेत, पो स्टे कोतवाली, अकोटफाईल, सिव्हिल लाइन , रामदासपेठ अकोला.
सदर कार्यवाही मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथक पो, नि, विलास पाटील यांच्या पथकाने केली