Home Breaking News in Marathi

मूर्तिजापूर शहरातील डॉ. पुरुषोत्तम चावके विरुद्ध गुन्हा दाखल !…

नरेंद्र खवले – मूर्तिजापूर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व परवाना नसतानाही कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. पुरुषोत्तम चावके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास अकोला व मुंबई शासकीय पथकाने आकस्मिक भेट दिली असता यावेळी परवाना नसतानाही दोन कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे निदर्शनास आले.

पुरुषोत्त्म चावके हे BAMS डॉ. असून सुद्धा कोरोना काळात अगदी कोणालाही न घाबरता गेल्यावर्षापासून बिन्दास्तपणे कोरोना रुग्णांवर उपचार करीत होते. मागील वर्षी गडगंज माया जमवून त्यांनी केळकर वाडी स्थित संतकृपा क्लिनिक बाल व जनरल केअर सेंटर सुरु केले. त्यांच्या विरुद्ध मागील वर्षी अनेक तक्रारी दाखल मिळाल्या होत्या.

यामध्ये भारिपच्या एका नगरसेवकाने जिल्हाधिकारी यांनी तोंडी तक्रार दिली असल्याची माहिती वरून पुरूषोत्तम चावके यांच्यावर गुरुवारी अकोला व मुंबई शासकीय पथकाने आकस्मिक भेट दिली असता कोरोना रुग्णांना भरती करून त्यांच्यावर उपचार करतांना आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ.सुरेश कराळे तालुका आरोग्य अधिकारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कुठलाही परवाना आढळला नाही.

दरम्यान डॉ.पुरूषोत्तम चावके (३१) यांच्याकडे कोरोना रुग्णांना भरती करवून त्यांच्यावर उपचार करण्याचा कुठलाही परवाना आढळला नाही. प्रशिक्षण व परवान्याअभावी कोरोना संसर्ग पसरण्याचा संभव असतांनाही आर्थिक फायद्यासाठी कोरोनारुग्णांना आंतररूग्ण म्हणून दाखल करवून घेतले.

या प्रकरणी डॉ.पुरुषोत्तम चावके यांच्याविरुद्ध भादंविच्या १८८, २६९, २७०,३३६, ४२० नुसार मुर्तिजापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!