पोहरादेवीला जमलेल्या संजय राठोड यांच्या १० हजार समर्थकांवर गुन्हा दाखल…

न्यूज डेस्क – पोहरा देवी येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर वाशीम पोलिसांनी १० हजार समर्थकांवर गुन्हा दाखल केले आहेत. या प्रकरणात गेल्या पंधरा दिवसांपासून गायब असलेले वनमंत्री संजय राठोड नुकतेच वृत्तमाध्यमांपुढे आले होते. त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करून पोहरादेवी गडावर मीडियाशी संवाद साधला आहे.

यावेळी त्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकणात आपल्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं आहे. पण पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड यांचे साधारणतः 8 ते 10 हजार समर्थक जमले होते. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणू फोफावत असताना अशाप्रकराचं शक्तीप्रदर्शन करणं, सार्वजानिक आरोग्यासाठी धोकादायक आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता रात्री आठ वाजता वाशिम पोलिसांना जाग आल्याचं दिसत आहे.

कारण उद्धव ठाकरे यांच्या नाराजीनंतर आता वाशिम पोलिसांनी संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या 10 हजार लोकांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही लोकांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

पण उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर पोलिसांना गर्दी दिसली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा गुन्हा आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे संजय राठोड यांनी सकाळी शक्ती प्रदर्शन केलं असताना वाशिम पोलिसांना गुन्हा दाखल करायला एवढा वेळ का लागला असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here