क्रेडिट एँक्सेस ग्रामीण लि. ब्रँच चा उपक्रम…

दानापूर – गोपाल विरघट

कोरोना काळात प्रत्येकाने आपापल्या परीने शक्य होईल असे दान धर्म, कोणी अन्न दान, रक्त दान, प्लाझ्मा दान, रोग्यांना औषधे दिली, कोणी कपडे वाटप केले, तर कुणी स्वच्छता केली सदर च्या दोन वर्षांमध्ये अनेकांनी आपल्या तिजोर्यांची दारे खुली केली यात शासनाने सुद्धा शेकडो योजना गोर गरीब जनतेला दिल्यात अजूनही शासनाची मोफत धान्य ही योजना दिवाळी पर्यंत सुरू राहील हे गेले दोन वर्षे दानाचे वर्षे म्हणून इतिहास नोंद घ्यावी असे आहेत. यात अनेकांचे नुकसानही झालेच मग तो गरीब असो व श्रीमंत व्यापारी असो व मजूर प्रत्येकजण या कोरोना मध्ये होरपळून गेला आहे.

आजही अनेक सेवा भावी संस्था आपले कार्य अविरत करत असताना दिसत अहेत आज तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील ग्राम पंचायत मध्ये सुद्धा याचा प्रत्यय पहायला मिळाला क्रेडिट एँक्सेस ग्रामीण लिमिटेड शाखा संग्रामपुर यांच्या वतिने दानापूर ग्राम पंचायत सरपंच तथा सदस्य व ग्राम पंचायत कर्मचारी यांना सँनिटायझर व मास्क चे वाटप केले. यावेळी डीईवो करण वाघ, ऋषिकेश पुरभे, प्राणजीत सर, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच, सदस्य तथा कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here