CPM नेते सीताराम येचुरी यांच्या मोठ्या मुलाचे कोरोनामुळे निधन…

न्यूज डेस्क :- भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPM) नेते सीताराम येचुरी यांचा थोरले मुलगा आशिष येचुरी याचे आज सकाळी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. स्वत: येचुरी यांनी गुरुवारी ट्विट करून याबाबत माहिती दिली.

त्यात ते म्हणाले की ‘मला मोठ्या दुखा:ने सांगावे लागत आहे की कोरोनामुळे मी माझा मोठा मुलगा आशिष येचुरी याला गमावले आहे. येचुरी यांच्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलाच्या उपचारात मदत केल्याबद्दल त्यांनी डॉक्टर, परिचारिका, आघाडीचे कामगार, सफाई कर्मचारी आणि इतरांचे आभार मानले.

मिळालेल्या माहितीनुसार, सीताराम येचुरी यांचा मोठा मुलगा आशिष सुमारे 35 वर्षांचा होता. त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथे दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, परिस्थिती चिंताजनक झाल्याने त्याला गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here