राजगुरूनगर कोविड सेंटरमधील कोविड युद्धा हरपला…

राजगुरूनगर ( पुणे ) येथील ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा सहाय्यक व चांडोली कोविड सेंटरमध्ये सुरू केल्यापासून उत्कृष्ट सेवा बजावणारे कोविड योद्धा डॉक्टर योगेश कांबळे ( वय.४४ वर्षे,रा.) यांचे सोमवार ( दि.७) रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वाकी संतोषनगर गावच्या हद्दीत अपघाती निधन झाले.अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.

येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चांडोली कोविड सेंटर मध्ये दिवसभराची आपली सेवा बजावून डॉक्टर योगेश कांबळे आपल्या ताब्यातील ( एमएच १४ जि ए ७६१७ ) या चारचाकी वाहनातून घरी जात असताना वाकी गावच्या हद्दीतील संतोषनगर येथे पुणे नाशिक महामार्गावर रस्त्याच्या मध्येच उभ्या असलेल्या पिकअप ( एम एच १२ के पी ७५५३ ) या चारचाकी गाडीला धडक होऊन झालेल्या अपघातात त्यांचे निधन झाले.

चांडोली कोविड सेंटर सुरू केल्यापासून डॉक्टर योगेश कांबळे यांनी कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावे तसेच त्यांच्या राहण्या – जेवण्याची काळजी घेणे,प्रत्येक रुग्णांशी फोनवर बोलून त्यांची सतत अपडेट घेऊन त्यांना आधार देण्याचे काम डॉक्टर सकाळी ड्युटीवर आल्यापासून रात्री उशिरा घरी जाईपर्यंत काळजी घेत होते.

त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याने चांगला कोविड युद्धा गमावला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून येथील पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here