अकोल्यात खाजगी रुग्णालयातून आजपासून कोविड लसीकरण…

अकोला (जिमाका)- जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसेच फ्रन्टलाईनवर काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. केन्द्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दुसरा टप्प्या सुरु करण्यात आला असून यात 60 वर्षावरील वयोवृद्ध व 45 वरील वयोगटातील दुर्धर आजार असणाऱ्या व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आलेला आहे. याबाबतची खाजगी लसीकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात आयोजीत करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा शल्य चिकीत्सक तथा प्रभारी उपसंचालक आरोग्य डॉ. राजकुमार चव्हान, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, डॉ. अश्वीनी खडसे, डॉ. अनुप चौधरी आदि उपस्थित होते.

जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयातून लसीकरण आज (दि.3) पासून करण्यात येणार आहे. यात संत तुकाराम हॉस्पीटल, सिटी हॉस्पीटल, माऊली मॅटरनिटी व सर्जिकल हॉस्पीटल, डॉ. के.एस. पाटील हॉस्पीटल ॲन्ड पॉलिक्लिनिक हॉस्पीटल, श्रीमती बी.एल. चांडक रिसर्ज फाऊंडेशन(वसंती हॉस्पीटल) आणि शुक्ला मल्टीस्पेशलीटी हॉस्पीटलचा समावेश आहे.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोविन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनस्पॉट नोंदणीसुध्दा करण्यात येणार आहे. खाजगी रुग्णालयांनी लसीकरणाच्या जागी सामाजिक अंतर, मास्क वापर व सॅनिटाईज करणे या त्रिसूत्रिय नियमाचे पालन करावे.

येणाऱ्या व्यक्तीसाठी केंद्रावर ऑक्सीजन सिलेंडर व उपचारासाठी प्रशिक्षीत वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करावी. प्रत्येक व्यक्तीला लसीकरण झाल्यानंतर अर्ध्या तास निरिक्षणाखाली ठेवावे. लसीकरण झालेल्या व्यक्तीना 24 तासाच्या आत ताप येणे, डोके दुखणे व हात जड होणे यासारखे लक्षणे दिसण्याची शक्यता असते.

याबद्दलची माहिती देण्यात यावी. खाजगी लसीकरण केंद्रानी लसीचा गैरवापर होणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.आज 604 व्यक्तीना लसीकरण, आज जिल्ह्यातील शासकीय लसीकरण केंद्रावर 604 व्यक्तीचे लसीकरण करण्यात आले. यात 60 वर्षावरील 409 वयोवृद्धाचा तर 45 ते 59 वयातील दुर्धर आजार असणाऱ्या 34 व्यक्तीचा आणि 161 इतर व्यक्तीचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here