वाडी व बुटीबोरी येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु होणार – माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांना जिल्हाधिकारी यांचे आश्वासन…

नागपूर – शरद नागदेवे

हिगंणा- वाडी व बुटीबोरी या नगर परिषद क्षेत्रात कोविड लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी केली होती.
वाडी हे मोठ्या लोकवस्तीचे शहर असून येथील जेष्ठ नागरिकांना कोविड लस घेण्याकरिता वीस किलोमीटर अंतरावरील व्याहाड पेठ येथे जावे लागते तर बुटीबोरी येथील नागरिकांना लसीकरणासाठी सहा किलोमीटर अंतरावरील प्राथमिक आरोग्य केंद्र बोरखेडी येथे जावे लागते.

त्यामुळे दोन्ही शहरातील जेष्ठ नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे वाडी व बुटीबोरी येथे लसीकरण केंद्र सुरु करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली होती.सदर मागणी संदर्भात माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी सातत्याने पाठपुरवठा केला त्यास यश आले असून वाडी व बुटीबोरी येथे लवकरच कोविड लसीकरण केंद्र सुरु करणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

याकरिता माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे, जिल्हा परिषद सदस्य वृंदा नागपुरे, प स.नागपूर उपसभापती संजय चिकटे,माजी सभापती अहमदबाबू शेख, राकापा विधानसभा अध्यक्ष प्रकाश नागपुरे,राकापा तालुकाध्यक्ष संजय कुंटे,माजी गटनेते राजेश जैस्वाल,माजी नागराध्यक्ष प्रेम झाडे,राकापा कामगार सेल प्रदेश उपाध्यक्ष यजेंद्रसिहं ठाकूर,

राकापा युवक जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे, राकापा अनुसूचित जाती संतोष नरवाडे, वाडी शहर अध्यक्ष वसंत ईखनकर, प्रदीप चंदेल,सुरेंद्र मोरे, नगरसेवक संकेत दीक्षित,मंगेश सबाने,राकापा युवक तालुकाध्यक्ष रोशन खाडे, राकापा महिला तालुकाध्यक्ष सुनंदा ठाकरे,आदींनी सातत्याने जिल्हाधिकारी यांचेकडे पाठपुरवठा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here