राज्यातील पहिला प्रयोग शिर्ला ग्रामपंचायत उभारणार कोविड केअर सेंटर…आँनलाईन मासिक सभेत घेतला ठराव…

पातूर : पातुर तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायतीने वाढत जाणारी कोविड रुग्ण संख्या नियंत्रणात आणून रुग्णांचे प्राण वाचवले जावे यासाठी गावातच अद्यावत कोविड केअर सेंटर उभारण्याचा ठराव ऑनलाइन मासिक सभेत घेतला त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

अकोला जिल्ह्यात सर्वप्रथम शिर्ला ग्रामपंचायत क्षेत्रात सात रुग्ण निघाले होते त्यानंतर ही संख्या पाचशे ते सहाशे पेक्षा अधिक नागरिक पॉझिटिव्ह निघाले होते सध्या 75 पेक्षा अधिक सक्रिय रुग्ण आहेत . त्यामुळे गुरुवारी ऑनलाईन मासिक सभेमध्ये ग्रामपंचायतीचे सदस्य निर्भय पोहरे यांनी शिरला ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना तातडीने सुविधा मिळाव्या यासाठी शिरला ग्रामपंचायत अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून सुसज्ज अद्यावत कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे यासाठी प्रस्ताव मांडला.

प्रस्तावाला ग्रामपंचायत सदस्य फिरोज खान यांनी अनुमोदन दिले आणि ग्रामपंचायत सरपंच अर्चना सुधाकर शिंदे उपसरपंच कल्पना ज्ञानेश्वर खर्डे ग्रामपंचायत सदस्य रेखाताई गवई, मनोहर पातूरे, सय्यद इरफान सागर कढोणे, सुरेखा वसतकार, राजिक शाह मंगल डोंगरे वैशाली गावंडे किरण येनकर, पूजा इंगळे सर्व उपस्थित सर्व सदस्यांनी सर्वानूमते ठरावाला मंजुरी दिली.

पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत 16 लाख 71 हजार रुपये निधीची तरतूद शिरला ग्रामपंचायतीने कोविड केअर सेंटर साठी केली आहे सदर तरतूद कृती आराखडामध्ये नसल्यामुळे त्यासाठी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्याकडून आराखडा बदलण्यासाठी जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केला आहे.

जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना मुळे नागरिक सर्वत्र मृत्युमुखी पडत आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी बेड उपलब्ध नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव वाचवणे शक्य होत नाही त्यामुळे गावातच कोबी केअर सेंटर उभारण्यात यावे अशी विनंती सभेला केली सर्वांनी त्याला मान्यता दिली अशी प्रतिक्रिया ठराव प्रस्तावना करणारे ग्रामपंचायत सदस्य निर्भय पोहरे यांनी दिली.

सभेने मांडलेला प्रस्तावाला तत्वा:मंजुरी दिली आहे मात्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या ठरावाला मंजुरी दिल्यानंतरच कोविड केअर सेंटर अस्तित्वात आणणे शक्य होईल अशी प्रतिक्रिया ग्राम विकास अधिकारी राहुल ऊंदरे यांनी दिली आहे. शिरला ग्रामपंचायतीच्या सेवालाल भवन येथे ऑक्सिजन , व्हेंटिलेटर प्रथमोपचार सह अत्याधुनिक बेडची व्यवस्था करण्याचे नियोजन शिर्ला ग्रामपंचायतीने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here