तांदळी खुर्द येथे कोविड १९ लसीकरण मोहीम संपन्न…

पातूर – निशांत गवई

पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तांदळी खुर्द येथे प्रा आ केन्द्र बाभुळगांव अंतर्गत दि ९ जुन रोजी प्रा आ केन्द्राचे कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनात कोविड १९ लसीकरण व स्वाॅब कलेक्जन घेण्यात आले या मोहिमेत तादळि खुर्द येथील ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला असून तांदळी खुर्द येथील जेष्ठ नागरिक माजी जि प सदस्य ऊगले गुरूजी वय ९० वर्षे यांनी कोविडची लस घेऊन शिबिरास उपस्थित असलेले डाॅ परमाळे व प्रा आ केन्द्र बाभुळगांव येथील कर्मचारी यांचे स्वागत ऊगले गुरूजी यांनी केले.

शिबिराचे आयोजन बाभुळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा कडून करण्यात आले तांदळी खुर्द येथे कोविड लसीकरणा मध्ये ५५ नागरिकांना लस देण्यात आली लसीकरण करण्या करिता गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन नागरिकांना प्रवृत्त केले हे शिबीर यशस्वी करणे करिता मोलाचे सहकार्य प्रा आ केन्द्र बाभुळगांव वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय शिरसाट, राठोड, मेसरे गायकवाड, कराळे,खंडारे डाॅ श्रीमती देशमुख ,वानखडे ,डाॅ परमाळे ,मराठे व ग्रा प सचिव वसतकार मॅडम यांनी परिश्रम घेतले वाहन चालक सुधाकर धाङसे, देशमुख व अंगणवाडी सेविका यांनी मोलाचे सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here